मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. प्रो कबड्डी 2021
Written By
Last Modified: मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (14:35 IST)

प्रो कबड्डी लीगच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, या तारखेपासून PKL 8 ची जादू पसरणार

प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 22 डिसेंबरपासून बेंगळुरू येथे होणार आहे. मात्र त्यात प्रेक्षकांना येऊ दिले जाणार नाही. पीकेएल आयोजक मशाल स्पोर्ट्सने म्हटले आहे की, खेळाडू आणि बाकीच्यांचे आरोग्य लक्षात घेऊन ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-19 महामारीमुळे 2020 मध्ये ही लीग आयोजित करता आली नाही. 
 
त्यानंतर 2021 च्या सुरुवातीलाही ही लीग होऊ शकली नाही. पीकेएलच्या आयोजकांकडून सांगण्यात आले की, 'लीग प्रेक्षकांशिवाय एकाच ठिकाणी आयोजित केली जाईल, जी मागील हंगामातील पारंपारिक पद्धतीपेक्षा वेगळी असेल. PKL चे पुनरागमन हे भारतातील इंटरएक्टिव्ह इनडोअर स्पोर्ट्स पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असेल.
 
आयोजकांनी अहमदाबाद आणि जयपूरलाही यजमान मानले पण शेवटी यजमानपद बेंगळुरूकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जैव-सुरक्षित वातावरण (बायो बबल) तयार केले जाईल. आयोजकांनी पुढे सांगितले की, लीगमध्ये सर्व सरकारी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांचे पालन केले जाईल. बायो बबल तयार करण्यासाठी आणि कडक सुरक्षा उपाय लागू करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील. पीकेएलमध्ये 12 संघ सहभागी होतील. त्यासाठी ऑगस्टमध्ये खेळाडूंचा लिलाव झाला. यामध्ये प्रदीप नरवाल हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला यूपी योद्धाच्या संघाने 1.65 कोटी रुपयांमध्ये सामील केले होते.