शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. प्रो कबड्डी 2021
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (11:53 IST)

प्रो कबड्डी लीगाच्या 8व्या हंगामाची सुरुवात: बेंगळुरू बुल्स विरुद्ध यू मुंबा यांच्या पहिला सामना

बेंगळुरू, 21 डिसेंबर (पीटीआय) कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराच्या धोक्यामुळे, प्रो कबड्डी लीगचा (पीकेएल) आठवा हंगाम बुधवारपासून एकाच ठिकाणी बायो-बबल (जैव-सुरक्षित वातावरण) मध्ये आयोजित केला जाईल. जिथे प्रेक्षकांना परवानगी नसणार.
 
बारा संघांच्या लीगची सुरुवात माजी चॅम्पियन यू मुंबा आणि बेंगळुरू बुल्स यांच्यातील सामन्याने होईल तर दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात तेलुगू टायटन्सची तामिळ थलायवासशी लढत होईल.
 
या हंगामात पहिले चार दिवस आणि नंतर दर शनिवारी तीन सामने खेळवले जातील. बुधवारी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यात गतविजेत्या बंगाल वॉरियर्ससमोर यूपी योद्धाचे आव्हान असेल.
 
सीझन 7 चा टॉप स्कोअरर पवन कुमार सेहरावत बेंगळुरू बुल्सला तरुणांनी सज्ज यू मुंबा विरुद्ध चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न करेल. बंगळुरू संघात चंद्रन रणजीत देखील आहे, ज्याने गेल्या हंगामात दबंग दिल्लीसाठी छाप पाडली होती.
 
फजल अत्राचलीच्या नेतृत्वाखालील बचावाकडून चांगल्या कामगिरीवर यू मुंबाच्या आशा टिकून राहतील. रेडर अभिषेक आणि अजित ही युवा जोडी प्रतिस्पर्धी संघाचा अनुभवी बचाव भेदण्याचा प्रयत्न करतील.
 
दुसऱ्या सामन्यात तेलुगू टायटन्सच्या आशा सिद्धार्थ देसाई आणि रोहित कुमार या अनुभवी रेडींग जोडीवर असतील. तामिळ थलायवासचा बचाव मात्र 'ब्लॉक मास्टर' सुरजीतची वाट पाहत आहे, ज्याच्याकडे पीकेएलच्या इतिहासात सर्वाधिक (116) यशस्वी ब्लॉक्स आहेत.
 
गतविजेता बंगाल वॉरियर्स त्यांच्या मोहिमेची सुरुवात मजबूत UP योद्धा संघाविरुद्ध करेल. पाचव्या सत्रात लीगमध्ये सामील झाल्यावर प्रत्येक वेळी UP प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला आहे. यावेळीही लिलावात संघाने पीकेएलचा सर्वाधिक मागणी असलेला रेडर प्रदीप नरवाल याला स्थान दिले आहे.