बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. कारगिल विजय दिवस
Written By

कारगिल विजय दिवस: मॉलमध्ये सेनेच्या शौर्याची झाकी (फोटो)

कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) च्या 20व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने देशाच्या जनतेला सेना शौर्य आणि पराक्रम दर्शवण्यासाठी भारतीय नौसेनेने मुंबईच्या फिनिक्स मॉलमध्ये पॅव्हेलियन तयार केले आहे.
पॅव्हेलियनमध्ये सेनेचे वॉरशिपची कलात्मक झाकी तयार करण्यात आली आहे. या झाकीत एमओ (मुंबई) च्या तांत्रिकी कर्मचार्‍यांद्वारे तयार केले गेले आहे.
फिनिक्स मॉल, कुर्ला आणि हाय स्ट्रीट फिनिक्स मॉल, लोअर परेलमध्ये हे पांडाळ तयार केले होते ज्यात लढाऊ विमानांसह कारगिल युद्धात विजय मिळवून देणारे नायकांचे चित्र होते.
लोकांनी या पॅव्हेलियनमध्ये सेनेच्या हत्यारांसह त्यांचे पराक्रम दर्शवत असलेले पारंपरिक सँड आर्ट देखील बघितलं. वेगवेगळे पॅव्हेलियनमध्ये वेगवेगळ्या झाक्या प्रदर्शित करण्यात होत्या.
 
लोअर परेलमध्ये विभिन्न पोस्टर आणि प्रेरक चित्रपटांच्या माध्यमाने दर्शकांना सेनेच्या कार्यांबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. दर्शकांसाठी कारगिलच्या पहाडी भागात, मशीन गन मॉडल, मिसाइल इतर मॉडेलसोबत फोटो घेण्यासाठी सेल्फी पॉइंट देखील तयार केले गेले. पॅव्हेलियनमध्ये बंकर देखील तयार केले होते.
सेनेच्या बँडने देशभक्तीची धून लावून दर्शकांना रोमांचित केले. भारतीय नौसेनेचे कर्मचार्‍यांनी लोकांनी वेगवेगळे पराक्रमाने परिपूर्ण मिशनबद्दल माहिती दिली. या व्यतिरिक्त भारतीय नौसेनेच्या ब्रोशर आणि पोस्टर देखील लोकांना वितरित करर्‍यात आले.