शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. कारगिल विजय दिवस
Written By

कारगिल युद्ध घटनाक्रम

3 May 1999
एका मेंढपाळाने भारतीय लष्कराला कारगिलमध्ये पाकिस्तान सैन्याला घुसखोरी करत कब्जा केल्याची सूचना दिली.
 
5 May
भारतीय सेनेची पेट्रोलिंग टीम माहिती घेण्यासाठी कारगिल पोहचली तर पाकिस्तानी सेनेने त्यांना धरले आणि त्यातून 5 लोकांची हत्या केली.
 
9 May
पाकिस्तानी गोळीबारीत भारतीय सेनेचं कारगिलमध्ये असलेलं दारुगोळ्याचं पुरवठा नष्ट झाला.
 
10 May
पहिल्यांदा लडाखच्या प्रवेश द्वार म्हणजे द्रास, काकसार आणि मुश्कोह सेक्टरमध्ये पाकिस्तानी घुसखोरांना बघितले गेले.
 
26 May
भारतीय वायुसेने कार्यवाहीचे आदेश मिळाले.
 
27 May
कार्यवाहीत भारतीय वायुसेनेने पाकिस्तान विरुद्ध मिग-27 आणि मिग-29 वापरलं आणि फ्लाईट लेफ्टनंट नचिकेताला बंदी केली.
 
28 May
एक मिग-17 हेलिकॉप्टर पाकिस्तान द्वारा पाडण्यात आले आणि त्यात चार भारतीय सैनिक मरण पावले.
 
1 June
एनएच- 1A वर पाकिस्तान द्वारे जोरदार गोळीबार झाला.
 
5 June
पाकिस्तानी रेंजर्सकडून मिळालेल्या पेपर्सला भारतीय सेनेने वृत्तपत्रांसाठी जारी केले, ज्यात पाकिस्तानी रेंजर्स असल्याचं आढळले.
 
6 June
भारतीय सेनेने पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर कार्यवाही सुरू केली.
 
9 June
बाल्टिक क्षेत्राच्या 2 अग्रिम चेकपॉईंट्सवर भारतीय सेनेने पुन्हा कब्जा ताब्यात घेतला.
 
11 June
भारताने जनरल परवेझ मुशर्रफ आणि आर्मी चीफ लेफ्टनंट जनरल अजीज खान यांच्याशी चर्चा केल्याची रेकॉर्डिंग जारी केली, ज्यात या घुसखोरीत पाकचा हात असल्याचे स्पष्ट होते.
 
13 June
भारतीय सेनेने द्रास सेक्टरमध्ये तोलिंगवर कब्जा केला.
 
15 June
अमेरिकी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांनी परवेझ मुशर्रफ यांना फोनवर सांगितले की आपली सेना कारगिल सेक्टरहून बाहेर करा.
 
29 June
भारतीय सेनेने टाइगर हिलजवळ दोन महत्त्वपूर्ण चेकप्वाईंट्स पुन्हा ताब्यात घेतले.
 
2 July
भारतीय सेनेने कारगिलवर तिन्ही बाजूने ह्ल्ला केला.
 
4 July
भारतीय सेनेने टाइगर हिल पुन्हा ताबा घेतला.
 
5 July
भारतीय सेनेने द्रास सेक्टरवर पुन्हा ताबा घेतला आणि लगेच पाकिस्तानच्या पंतप्रधान यांना आपली सेना हटविण्यासाठी सांगितले.
 
7 July
भारतीय सेनेने बटालिकमध्ये स्थित जुबर हिलवर ताबा घेतला.
 
11 July
पाकिस्तानी रेंजर्सने बटालिकहून पळ काढायला सुरू केले.
 
14 July
पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ऑपरेशन विजयाची घोषणा केली.
 
26 July
पंतप्रधान यांनी हा दिवस विजय दिवसच्या रूपात साजरा करावा अशी घोषणा केली.