मंगळवार, 9 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 20 एप्रिल 2019 (10:41 IST)

अटलजी यांच्या वेळी कारगिल झाले मात्र त्यांनी त्याचा बाजार मांडला नाही - राज ठाकरे

raj thackeray
पाकीस्थानचा प्रधानमंत्री इम्रान खान यांना मोदी भारताचे पंतप्रधान व्हावे असं वाटतं?’ आजपर्यंत हे असे कधीही झाले नाही. तसेच स्वर्गीय अटलजींच्या वेळीही कारगिल युद्ध झाले होते, मात्र त्यांनी मोदींसारखा त्याचा कधीही याचा असा बाजार मांडला नाही, अशी अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.   
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वतःच्या दत्तक घेतलेल्या गावाचा विकास करता आला नाही, ते देशाचा काय विकास करणार? असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. रायगड येथील आपल्या जाहीर सभेत बोलत होते. राज म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार म्हणून जे गाव दत्तक घेतले होते, त्या गावात काहीच घडले नाही. गावात एकही सुविधा आली नाही. तेथील नालेही साफ होऊ शकले नाही. तेथे महाविद्यालय किंवा दवाखान्याचीह सोय नाही. स्वतः दत्तक घेतलेले गाव नीट करू शकला नाही, तर तुम्ही देशाचा काय विकास करणार?’आता नरेंद्र मोदींकडे दाखवण्यासारखे काहीच उरले नाही, त्यामुळेच ते पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांच्या नावावर मते मागत आहेत, असाही आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे भाजपवर प्रत्येक सभेत जोरदार टीका करत आहेत.