रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शुक्रवार, 19 एप्रिल 2019 (12:20 IST)

दलितांवर अन्याय झाल्यावर नरेंद्र मोदी गप्प का असतात? - राज ठाकरे

गुजरातच्या उनामध्ये दलित बांधवाना मारहाण झाली तेव्हा पंतप्रधान गप्प का होते? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील जाहीर सभेत केला.  
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरमधल्या अकलूज येथे भाषण करताना स्वत:च्या जातीचा उल्लेख केला. खालच्या जातीतले आहोत म्हणून आपल्यावर आरोप होत आहेत असं मोदी म्हणाले मग गेल्या 5 वर्षात दलितांना मारहाण झाली तेव्हा तुम्ही गप्प का होता? दलितांवर होणाऱ्या अन्यायावर भाष्य करत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
 
उनामध्ये गाय मारली नव्हती तर, गाय गेल्यावर त्यांची कातडी काढायला ज्यांना बोलावलं, त्यांना गोरक्षकांनी मारहाण केली. पण गो-हत्येवर मोदींची जर अशी तीव्र भूमिका असेल तर मग अनेक जैन मित्र बीफ एक्स्पोर्टमध्ये आहेत असे नरेंद्र मोदी सांगत होतात ना? मग नेमकी तुमची भूमिका काय? असा आरोप राज ठाकरेंनी केला.