सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 15 एप्रिल 2019 (10:43 IST)

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र मोदींचे संकेत, दिल्लीला नेण्याबद्दल मौन

देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही महाराष्ट्राला स्थैर्याची गरज आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचंच नेतृत्व करतील असे संकेत दिले आहेत. 'सकाळ'ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये त्यांनी फडणवीस यांच्या राजकीय भविष्याबद्दल अप्रत्यक्षपणे भाष्य केलं.
 
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी तुमचं काय मत आहे आणि केंद्रात एनडीएचे सरकार आल्यास मुख्यमंत्र्यांना दिल्लीला नेले जाईल का, या प्रश्नांना मोदी उत्तर देत होते. महाराष्ट्रात एकाच पक्षाचं सरकार आहे. शिवसेना सोबत आहे, पण एका अर्थानं ते एकाच पक्षाच सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्राला अस्थिर करण्याची गरज नाही, असं मोदींनी स्पष्ट केलं.