1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 18 एप्रिल 2019 (17:26 IST)

भाजपा प्रवक्त्याला पत्रकार परिषदेत बूट फेकून मारला हे आहे कारण

loksabha elections 2019
भाजप नेते जी. व्ही. एल. नरसिंह यांच्यावर भर पत्रकार परिषदेत एकाने बूट फेकून मारल्याचा प्रकार  घडला असू, बूट फेकणाऱ्याचे नाव शक्ती भार्गव असे असून तो व्यवसायानं डॉक्टर आहे. प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहराव दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते त्याचवेळी ही घटना घडली आहे. 
 
या माणसाने बुट फेकल्यानंतर मंचाकडे पळत जाण्याचाही प्रयत्न केला, मात्र भाजप कार्यकर्त्यांनी त्याला पकडले व हॉल मधून बाहेर काढले आहे. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. सरकारी मिलमध्ये 11 कामगारांनी आत्महत्या केल्या असून, त्याबद्दलच्या रागातून बूट फेकून मारल्याचे म्हटले जात आहे. आरोपी भार्गवच्या फेसबूक वॉलवर त्याने याबाबत काही लिखाणही केले आहे.