धाकटी बहीण आशा भोसले झाली भावूक, लहानपणीचा फोटो शेअर करत हा संदेश लिहिला
लता मंगेशकर यांच्या निधनाने त्यांचे कुटुंब, चाहते आणि संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. बहिणीच्या जाण्यानंतर आशा भोसले यांनी त्यांचा बालपणीचा फोटो शेअर करत लता दींची आठवण काढली आहे. आशा भोसले यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये दोन्ही बहिणी एकत्र दिसत आहेत. हा फोटो शेअर करत आशा भोसले यांनी लिहिले की, दीदी आणि मी, बालपणीचेही दिवसही काय होते. आशा भोसले यांच्या या पोस्टवर चाहते दोन्ही बहिणींवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तसेच लता मंगेशकर यांना आदरांजली वाहत आहे.
याशिवाय आशा भोसले यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्टही शेअर केली आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, देशात दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्याबद्दल खूप बातम्या येत होत्या. जेव्हा दोघेही हिंदी चित्रपटात गायचे तेव्हा दोघांमधील स्पर्धा आणि मतभेदाच्या बातम्या चर्चेत असायच्या. मात्र, एका मुलाखतीदरम्यान लता मंगेशकर यांनी याबाबत मोकळेपणाने सांगिगले होते. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, माझ्या आणि आशामध्ये नेहमीच सर्व काही बरोबर होते. आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ आहोत. आम्ही दोघे एकाच प्रोफेशनमध्ये आहोत, त्यामुळे अशा बातम्या येत राहतात, पण आमच्यात कधीच स्पर्धा झाली नाही. आम्हा दोघांची स्वतःची गाण्याची पद्धत आहे.