शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 महाराष्ट्र मतदारसंघ
Written By

मावळ लोकसभा निवडणूक 2019

मुख्य लढत : श्रीरंग बारणे (शिवसेना) विरुद्ध पार्थ पवार (राष्ट्रवादी)
 
पार्थ पवारांच्या रुपाने अजित पवारांची प्रतिष्ठ पणाला लागली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळमधून राष्ट्रवादीकडून लढत आहेत. पार्थ पवार यांच्या एन्ट्रीमुळे मावळची जागा राज्यभरात लक्षवेधी ठरली आहे. मावळ हा शिवसेनेचा गड आहे. शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे इथून विद्यमान खासदार आहेत. मात्र, इथे शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस आहे. याचा फायदा पार्थ पवारांना होऊ शकतो. शिवाय, अजित पवार यांनीही मुलासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली आहे. त्यात शेकापने सुद्धा पार्थ पवारांना पूर्ण पाठिंबा दिला आहे.
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.