मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मे 2019 (17:54 IST)

शेतकरी चळवळ सुरु ठेवणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघात पराभव झाला आहे. त्या जागेवर आता शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी झाले आहेत. त्यांनी ९६ हजार ३९ मतांनी शेट्टींचा पराभव केला आहे. यावर राजू शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. लोकांचा कौल आपल्याला मान्य आहे, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत. याशिवाय शेतकरी चळवळ आपण आपल्या परिने सुरु ठेवणार असे देखील ते म्हणाले आहेत.
 
राजू शेट्टी म्हणाले की, लोकांना माझ्यापेक्षा चांगला खासदार हवा, असं वाटत असेल तर त्याचा स्विकार करायला हवा. आपल्या मतदारांचा कल मान्य आहे. यापुढेही शेतकरी चळवळीत वेगवेगळ्या पद्धतीने काम करत राहील. याअगोदर दिल्लीत जाऊन शेतकऱ्याची बाजू मांडायचो आता रस्त्यावरची लढाई करुन शेतकऱ्यांसाठी काम करणार असे म्हटले आहे. भाजप नेत्यांनी जातीचे मुद्दे उपस्थित करुन विषारी राजकारण केलं’, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले आहेत.