बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 15 मे 2019 (11:09 IST)

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांडून तरुणाला चोप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला चोप दिला आहे. कोल्हापुरातील अक्षय तांबवेकर असे त्या तरुणाचे नाव आहे. ईव्हीएम नको, अशी आमची भूमिका आहे, असं वक्तव्य सुळे यांनी केले होतं. याविषयीच्या बातमीची पोस्ट एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवर करण्यात आली होती. त्याखाली कमेंटमध्ये अक्षयने सुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते त्याच्या घरी पोहचले आणि त्याला चोप दिला.
 
एवढेचं नव्हे तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अक्षयला कॅमेरासमोर आणि लिखित स्वरूपात माफी मागून घेतली. ‘सोशल मीडियावर केलेल्या चुकीच्या पोस्टबद्दल जाहीर माफी मागत आहे. आपल्याकडून झालेल्या चुकीची लेखी माफी मागितल्यावर कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला सोडून दिले आणि त्याच्या पालकांना मुलावर लक्ष देण्याची विनंती केली.