बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मे 2019 (09:42 IST)

बेईमान सहकारी, युवकाची नशेत केला नग्न व्हिडियो केले ब्लॅकमेलिंग, युवकाची आत्महत्या

सोबत राहणारे कधी धोका देतील आणि कसा फायदा उठवतील याचे सांगणे कठीण आहे. असाच प्रकार एका २४ वर्षीय युवकासोबत घडला असून, त्याने बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली आहे. डहाणू वाणगाव रेल्वे स्टेशनपाडा येथे राहणाऱ्या 24 वर्षीय राहुल मिश्रा या युवकाची दोन सहकाऱ्यांनी विवस्त्र चित्रफीत केली आणि ती दाखवू नये यासाठी पैशाची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास बदनामीची धमकी दिल्याने या वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून राहुल ने गळफास घेऊन आत्महत्याकेली. याबाबत वाणगाव पोलीस ठाण्यात त्याच्या भावाने फिर्याद दाखल केली आहे. 
 
मृत झालेला तरुण राहुल बोईसर येथील औद्योगिक वसाहतीच्या आरती ड्रग्स या कंपनीत काम करत होता, तो अन्य दोन सहकाऱ्यां सोबत शिवाजीनगर येथे भाड्याचा फ्लॅट घेऊन राहत होता. या ठिकाणी एकदा पार्टी करून तो झोपल्यानंतर त्यांनी त्याला विवस्त्र करत तो नशेत होता तेव्हा त्याचे  मोबाईलद्वारे फोटो व चित्रीकरण केले. ते डिलीट करण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करून ती पूर्ण न केल्यास सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दिली. मात्र, पैशांची पूर्तता करण्यास असमर्थ ठरल्याने त्याने भीतीपोटी वाणगाव येथे गळफास घेऊन आत्महत्याकेली. याबाबतचे फोटो, मेसेज आणि कॉल रेकॉर्डिंग त्याच्या मोबाईलमधून मिळाले. त्यानंतर हा प्रकार लक्षात येताच त्याच्या भावाने हा पुरावा वाणगाव पोलीस ठाण्यात सादर करून फिर्याद दाखल केली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.