शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 मे 2019 (16:26 IST)

सागरी किनारी मार्ग कोस्टल रोडचे काम होणार स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली

मुंबई येथे सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पासाठी समुद्रात टाकण्यात येणाऱ्या भरावाच्या कामासह इतर कामांस दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली असून, मागील अनेक दिवसांपासून अडकून पडलेले कोस्टल रोडचे काम मुंबई महापालिकेला पुन्हा सुरु करणार आहे. कोस्टल रोड प्रकरणी. २३ एप्रिल रोजी समुद्रात टाकण्यात येणाऱ्या भरावाच्या कामासह इतर कामांस उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. याच निर्णयाविरोधात पालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या बाबतच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यालयाने समुद्रात भर न टाकण्याच्या अटीवर महापालिकेला या कामासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई मनापा आता या रोडचे काम सुरु करू शकणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठाने दिलेल्या निर्णयामध्ये कोस्टल रोडचे बांधकाम करण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नसल्याचे मत नोंदवले आहे. तर त्या संधर्भात सुनावण्या जून महिन्यामध्ये होणार आहेत. बांधकाम थांबवून ठेवणे हे जनहिताच्या दृष्टीने योग्य नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यालयाने पालिकेला पावसाळ्याच्याआधीच बांधकाम सुरु करण्याची परवाणगी दिली आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेने न्यालयात दाखल केलेल्या अर्जामध्ये, मुंबईतील वाढत्या वाहतूककोंडीवर मुंबई कोस्टल रोड (दक्षिण) चांगला उपाय असून नागरीकांना सामना कराव्या लागणाऱ्या वाहतूक समस्या हाताळण्यासाठी अपुऱ्या पायाभूत सुविधांवरील समस्येवर हा कोस्टल रोड चांगला पर्याय आहे,’ असं स्पष्ट केले आहे.