शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शनिवार, 4 मे 2019 (12:35 IST)

महाराष्ट्रात फक्त 19 टक्के पाणीसाठा

महाराष्ट्रातील जलस्रोतात फक्त 19 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे महाराष्ट्रावरील पाणीसंकट आणखी गहिरं होण्याची शक्यता आहे. 
 
राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. गेल्या वर्षी 30.84% असलेला साठा यावर्षी 19.35%वर गेला आहे.
 
औरंगाबादमध्ये ही स्थिती अतिशय विदारक आहे. गेल्या वर्षी 28.2% असलेला हा साठा 5.14% वर येऊन पोहोचला आहे.
 
दुसऱ्या क्रमांकावर नागपूर विभाग आहे. तिथे हा साठा 10.17% आहे. गेल्या वर्षी हा आकडा 15.91% होता. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणूक आयोगाकडे यासंबंधी बैठका घेण्याची परवानगी मागितली आहे.