मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2019 (10:11 IST)

टिळक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिला वकिलाने न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न

tried suicide for the court
काँग्रेसचे नेते असलेले  रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या महिला वकिलाने न्यायालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या गंभीर  घटनेनंतर संबंधित महिलेला तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. संबंधित महिलेवर डेक्कन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्या जिल्हा न्यायालयातील जुन्या इमारतीमध्ये असलेल्या न्यायालयात हजर होत्या. टिळक यांचे वकील नंदू फडके यांच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी. सोबतच नंदू फडके यांचा मुलगा संदीप फडके यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महिलेवर डेक्कन पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असून, या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. तर महिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. आपण तपासात सहकार्य करण्यासाठी तयार असून पोलिसांनी चौकशी करावी, असा अर्ज देखील त्यांनी डेक्कन पोलिसांनी दिला आहे. मात्र त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. तसेच त्यांना गुंतवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांमुळे त्या तणावाखाली असल्याचा दावा फिर्यादी महिलेच्या वकीलांनी केला आहे.