मोबाईल रिचार्ज करणाऱ्या महिला मुलीना दुकानदार करायचा अश्लिल मेसेज
मोबाईल रिचार्ज करतांना महिला आणि मुलीनी काळजी घेनायची गरज आहे. कारण सातारा येथे एक घटना घडली आहे. यामध्ये मोबाईल शॉपीत बॅलन्सचे व्हाऊचर मारण्यासाठी आलेल्या महिला, मुलींचे मोबाईल क्रमांक त्यांना न कळत सेव्ह करूत त्यांना अश्लील मेसेज पाठवले जात असल्याचा प्रकार घडला आहे. हा सर्व प्रकार कराड शहर परिसरात घडला असून, पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाने हे सर्व उघडकीस आणले आहे. तर ज्या दुकानात व्हाऊचर मारल्यावर अश्लील मेसेज येण्यास सुरूवात होत होती, त्या मोबाईल शॉपी चालकास निर्भया पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या संशयीत दुकानदाराचे नाव गणेश दसवंत (रा. कराड) असे आहे. कराड येथील महिला महाविद्यालय परिसरात गणेश झेरॉक्स सेंटर व मोबाईल शॉपी असून, या मोबाईल शॉपीत महाविद्यालयात येणाऱ्या अनेक मुलींसह, या भागातील महिला मोबाईलचे व्हाऊचर मारण्यासाठी येत असत. हे व्हाऊचर मारल्यानंतर काही वेळातच त्या महिला किंवा मुलींना अश्लील मेसेज येण्यास सुरूवात होत होती. एकदा एका महिलेने असे रिचार्ज केले तर तिला काही वेळात असे मेसेज येणे सुरु झाले, तिने हा सर्व प्रकार तिच्या घरातील लोकांना आणि मैत्रीणीना सांगितला. मग हे सर्व महिलांच्या साठी असलेल्या निर्भया पथकाकडे गेले आणि त्यांनी सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस ठाण्यात येत निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक रूपाली चव्हाण, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल रेखा देशपांडे यांना हा प्रकार सांगितला. पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत सापळा रचत एका ओळखीच्या महिलेला असेच रिचार्ज करायला पाठवले त्या नंतर या महिलेला देखील असेच अश्लिल मेसेज आले त्यावेळी पोलिसांना खात्री पटली ही येथूनच हा प्रकार होतो तेव्हा पोलिसांनी या गणेश दसवंतला अटक केली आहे.