1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 6 मे 2019 (15:11 IST)

अहमदनगरमध्ये ऑनर किलिंग, मुलीची हत्या, जावयाला पेटवले

owner killing in ahmednagar
अहमदनगरमध्ये आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी दोघांच्या अंगावर रॉकेल ओतून हत्या करण्याचा प्रयत्न केला. लग्नाला घराच्यांचा विरोध असताना लग्न करणार्‍या मुली आणि जावयला मुलीच्या काका आणि मामाने जाळण्याचा प्रयत्न केला. यात मुलीचा मृत्यू झाला असून मुलावर उपचार सुरु आहे.
 
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीचे काका आणि मामा यांना अटक केली आहे, तर तिचे वडील फरार आहेत. 
 
गंभीर भाजलेल्या मुलाचे नाव मंगेश रणसिंग असून त्यावर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मुलीचे नाव रुक्मिणी रणसिंग असे होते. दोघांनी सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. मुलीच्या कुटुंबीयांना विवाह मान्य नव्हता आणि या कारणामुळेच त्यांनी दोघांना जाळण्याचा प्रयत्न केला.
 
घरगुती वादातून रुक्मिणी आपल्या माहेरी गेली होती. तिला भेटायला मंगेशही आपल्या सासरी पोहचला. नंतर मुलीचे वडील, काका आणि मामा यांनी त्याला बेदम मारहाण केली. हा सर्व प्रकार घल्यानंतर रुक्मिणीने पुन्हा पतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ते दोघेही निघाले असात, कुटुंबीयांनी त्यांना एका खोलीत डांबलं आणि नंतर त्यांच्यावर रॉकेल ओतून पेटवून दिले. गंभीर भाजल्याने रुक्मिणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.