बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 27 मार्च 2019 (09:52 IST)

नितीन गडकरी यांच्याकडे सर्वाधिक 18 कोटींची मालमत्ता

नागपूर लोकसभा निवडणुकीत 48 उमेदवारंमध्ये भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्याकडे सर्वाधिक 18 कोटींची मालमत्ता आहे. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील संपत्तीविषयक विवरणात ही माहिती त्यांनी दिलेली आहे. काँग्रेसचे नाना पटोले हेसुद्धा कोट्यधीश आहेत. विशेष म्हणजे दोघांचाही मुख्य व्यवसाय शेती आहे. उमेदवारी अर्जासोबत दोघांनी सादर केलेल्या उत्पन्नाच्या शपथ पत्रात ही माहिती दिली आहे.
 
नितीन गडकरी यांच्याकडे असलेल्या 18 कोटींची मालमत्तेत 69 लाख 38 हजारांच्या जंगम मालमत्तेचा समावेश आहे. त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्याकडे 91 लाख 99 हजारांची मालमत्ता आहे. कुटुंबाकडे 66 लाख सात हजार रुपये असल्याचे दर्शवले आहे. यात गडकरींकडे 10 हजार 750 रुपये रोख तर पत्नीकडे 18 हजार 500 रुपये रोख आहे. कुटुंबाजवळ 25 हजार रुपये आहेत. नितीन गडकरी यांच्या विविध बँक खात्यात आठ लाख 99 हजार तर पत्नीच्या खात्यात 11 लाख सात हजार रुपये आहेत. 35 लाखांत विविध ठिकाणचे शेअर खरेदी केले आहे. पत्नीच्या नावे 10 लाखांचे शेअर दर्शवले आहे. 14 लाख 80 हजारांची गुंतवणूक गडकरी यांनी तर पत्नीच्या नावे 23 लाख 33 हजारांची गुंतवणूक दर्शवली आहे.