1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Updated : गुरूवार, 11 एप्रिल 2019 (17:07 IST)

राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोटो गायब

radhakrishna vikhe patil
विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांमुळे राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस महाआघाडीच्या बॅनरवरून त्यांची छबी गायब करण्यात आली आहे. नाशिकमध्ये शरद पवार यांच्या सभेत हा प्रकार घडला आहे. दुसरीकडे प्रचार सभेच्या ठिकाणी अनेक पोस्टरवर शरद पवार आणि त्यांच्या जोडीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे छायाचित्र झळकले आहेत.
 
राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी नाशिक तालुक्यातील सिध्दप्रिंपी येथे शरद पवार यांची आज सभा असून याठिकाणी व्यासपीठावर असलेल्या छायाचित्रांमधून विखे पाटील यांचे छायाचित्र गायब करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे डी. पी. त्रिपाठी, कॉँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, मनसे उपाध्यक्ष राहुल ढिकले देखील सभेस उपस्थित आहेत.