बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 16 एप्रिल 2019 (19:22 IST)

ही लढवत असलेलो माझी शेवटची निवडणूक - सुशीलकुमार शिंदे

मी यानंतर कोणत्याही निवडणुकीत उभा राहणार नसून, माझी ही शेवटची निवडणूक आहे. यामुळे तुम्ही मला निवडून द्या असे भावनिक आवाहन सोलापूरचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. सोबतच त्यांनी राजकीय क्षेत्रातून निवृत्ती जाहीर केली आहे. सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे हे निवडणूक लढवत असून, त्यांच्या विरुध्द भाजपकडून डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
 
सोबतच सोलापुर येथील सभेत सुशीलकुमार शिंदेंनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिंदे यावेळी म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वंचित आघाडीच्या माध्यमातून एमआयएम या कट्टर जातीयवादी पक्षाबरोबर आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या सेक्युलॅरिझमचा खून केला असून, जातपात न मानणाऱ्या सीपीएमने त्यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे आंबेडकर हे भाजपने उभे केलेले पिल्लू आहेत. सर्वधर्म समभावाचे वोट तोडत आहेत. मतांच्या विभागणीसाठी प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत असे शिंदे म्हणाले आहेत.