बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Updated : शुक्रवार, 24 मे 2019 (14:08 IST)

शिवसेनेच्या या जिंकलेल्या उमेदवारांना लॉटरी लागेल मोदी सरकार मध्ये

भाजप शिवसेना युतीने राज्यात चांगले प्रदर्शन करत  विजय मिळवला. यामध्ये शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळाला आहे. मात्र ४ ज्येष्ठ नेत्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले  आहे. तर सत्ता स्थापनेवेळी एनडीएच्या घटकपक्षांसोबत शिवसेनेच्या निवडून आलेल्या खासदारांची मंत्रिपद मिळणार आहे. यामध्ये विनायक राऊत, गजानन किर्तीकर, प्रताप जाधव, राजन विचारे, राजेंद्र गावित, भावना पुंडलिकराव गवळी यांची नावे जोरदार चर्चेत आहेत. लोकसभा निवडणूकीत भाजप शिवसेना युती झाली होती, नंतर शिवसेनेने लढविलेल्या जागांपैकी १८ जागा त्यांनी राखल्या आहेत. युतीने राज्यात कॉंग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीला पराभूत केले आहे, विशेष म्हणजे शरद पवार यांचे नातू पराभूत झाले आहेत. शिवसेनेसोबत युती असल्याने त्यांना भाजपा  केंद्रात २०१४ प्रमाणे मंत्रीपद देणार आहे. मात्र शिवसेनेकडून मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेले ४ उमेदवार या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यामध्ये चंद्रकांत खैरे, माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते, आनंदराव अडसूळ, नरेंद्र पाटील, शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यात मंत्रीपदासाठी चुरस होती. मात्र त्यांचा पराभव झाल्यानंतर आता निवडून आलेल्या उमेदवारांपैकी ६ ते ७ खासदार हे मंत्रिपदाच्या शर्यतीत असून, विनायक राऊत, गजानन किर्तीकर, प्रताप जाधव, राजन विचारे, राजेंद्र गावित, भावना पुंडलिकराव गवळी यांची नावे मंत्रीपदासाठी जोरदार  चर्चेत आहेत. त्यामुळे नेमकी कोणाची वर्णी मंत्रीपदी लागेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.