1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 13 मार्च 2018 (15:22 IST)

वैज्ञानिकांना मोठे यश, नवे 15 ग्रह शोधले

15 new planets confirmed around cool dwarf stars

वैज्ञानिकांनी  संशोधनात नवे 15 ग्रह शोधून काढले आहेत. यामधील तीन ग्रहांना सुपर अर्थ अशी नावे दिली आहेत. तसेच यातील एका ग्रहावर संशोधनात वैज्ञानिकांनी पाणी सापडलं आहे. या अगोदर झालेल्या संशोधनात देखील पाणी सापडलं आहे. तसेच मंगळ ग्रहावर देखील पाणी सापडलं आहे.  हे ग्रह पृथ्वीपासून 200 प्रकाश वर्ष दूर स्थित असून पृथ्वीपेक्षा मोठे आहेत.  

हा शोध जपानच्या टोक्यो इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिकांनी केला आहे. यामध्ये त्यांनी जगातील सर्वात सुंदर आणि महत्वाच्या टेलीस्कोपची मदत घेतली आहे. यामध्ये अमेरिकेतील नासाच्या K2 ची आणि स्पेनच्या नॉरडिक ऑप्टिकल टेलीस्कोपची मदत घेतली आहे. 

शोध लावलेले नवीन 15 ग्रह हे सौरमंडळात आहेत. हे सर्व ग्रह लाल रंगाच्या ताऱ्यांभोवती फिरत आहेत. लाल तारे हे आकारात सामान्य असून ते अधिक थंड असतात. त्यामुळे संशोधकांच्या मते भविष्यात एक्सोप्लॅनेट संदर्भात आकर्षक माहिती मिळू शकते.