शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : गुरूवार, 20 मे 2021 (16:39 IST)

पुण्यातील 16 वर्षाच्या मुलाने इंटरनेट हादरवून टाकले, तब्बल 50 हजार छायाचित्रे एकत्र करून सुस्पष्ट चंद्रबिंब टिपण्याची कामगिरी

जर मनात काही करायचे ठरवून घेतलं असेल तर वय कधीच त्याच्यामध्ये अडथळा बनू शकत नाही. होय, महाराष्ट्राच्या पुणे येथे राहणा 16 वर्षीय प्रथमेश जाजूने ही असेच काही केले आहे.
होय, इंटरनेटच्या युगात कोणतीही गोष्ट लपून राहतं नाही, कारण सोशल मीडिया प्रत्येकाला ओळख व आपल्या कामगिरीसाठी नाव देण्यात मदत करतं. अनेकदा मॅन स्ट्रीममध्ये बातमी पोहचत नाही तोपर्यंत सोशल मीडियावर धूमाकूळ घालून देते. प्रथमेश द्वारे तयार चंद्राचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा लोकांना पुण्यात कलाकार असल्याचं माहित पडलं.
 
आता जाणून घ्या की प्रथमेशने असे काय केले की रात्रभरात स्टार झाला. प्रथमेशने चंद्राचे असे चित्र काढले जे अत्यंत सुंदर आणि माहितीने परिपूर्ण आहे. तब्बल 50 हजारहून अधिक छायाचित्रे एकत्र करून 186 जीबीचे (गिगाबाइट) सुस्पष्ट चंद्रबिंब टिपण्याची कामगिरी प्रथमेशने साधली आहे.
 
प्रथमेश जाजू स्वत:ला एक हौशी एस्ट्रोनोमर व एस्ट्रो फोटोग्राफर असल्याचं सांगतो. मॉडेल कॉलनीतील विद्या भवन या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रथमेश दहावीत आहे. तो स्पष्ट करतो की मिनरल मूनच्या थर्ड क्वार्टरची ही सर्वात अधिक माहितीपूर्ण व स्पष्ट शॉट आहे. 
 
गेली काही वर्षे प्रथमेश ज्योर्तिविद्या परिसंस्था या भारतातील खगोलशास्त्रविषयक सर्वांत जुन्या संस्थेशी हौशी खगोलप्रेमी आणि स्वयंसेवक म्हणून जोडलेला आहे. त्याने सांगितले की फोटो दोन भिन्न फोटोंचा एक HDR कंपोसाइट आहे. हा फोटो 3-डाइमेंशनल इफेक्ट देण्यासाठी केला गेला होता. त्याच्याप्रमाणे हा थर्ड क्वार्टरच्या मिनरल मूनचा सर्वात क्लिअर शॉट आहे.
 
या प्रक्रियेदरम्यान रॉ डेटा सुमारे 100 जीबी होता आणि जेव्हा प्रोसेस केले तेव्हा डेटा वाढला तेव्हा तो सुमारे 186 जीबीपर्यंत पोहोचला. जेव्हा सर्वांना एकत्र केलं तेव्हा सुमारे 600MB पर्यंत पोहचला. फोटो 3 मे रोजी दुपारी 1 वाजता क्लिक झाला. ही प्रक्रिया व्हिडिओ आणि फोटोंसह सुमारे 4 तास चालली. या प्रक्रियेस सुमारे 38-40 तास लागले. यात 50 हजार फोटो क्लिक करण्यामागचे कारण म्हणजे चंद्राचा सर्वात स्पष्ट फोटो क्लिक करणे होते. घराच्या गच्चीवरून चार तास छायाचित्रण करून प्रथमेशने त्यातील छायाचित्रांवर जवळपास दोन दिवस प्रक्रिया करून चंद्राचे छायाचित्र मिळवले आहे.
ही प्रक्रिया करण्यापूर्वी प्रथमेशने बर्‍याच स्टोरीज वाचल्या आणि बरेच व्हिडिओ पाहिले. जेणेकरून प्रोसेसिंग आणि फोटो क्लिक करण्याबद्दल माहिती मिळावी. प्रथमेशला प्रोफेशनली एस्ट्रोनॉमीचा अभ्यास करायचा आहे. सध्या तरी तो हौस म्हणून एस्ट्रो फोटोग्राफी करतो.