गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 21 फेब्रुवारी 2024 (13:15 IST)

ऑनलाईन गेम खेळताना 2 मुलांची आई पडली प्रेमात

rape
ऑनलाईन गेम मुळे महिला प्रेमात पडल्याच्या घटना या पूर्वी देखील घडल्या आहे. आता पुन्हा ऑनलाईन गेम फ्री फायर खेळताना उत्तराखंडची एक महिला मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलाचा प्रेमात पडण्याची घटना घडली आहे. 
 
सदर महिला विवाहित असून तिला 2 मुलं  आहे. ही  महिला प्रियकराच्या प्रेमात एवढी वेडी झाली आहे की ती चक्क दोन्ही मुलांना घेऊन प्रियकराच्या घरी पोहोचली. 

हा प्रकार पाहून मुलाच्या कुटुंबियांना धक्काच बसला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं आणि पोलिसांनी येऊन महिलेला समजावून परत तिच्या घरी पाठवलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखण्डातील महिलेला ऑनलाईन गेम खेळण्याचं व्यसन लागलं तसेच व्यसन सिधी जिल्ह्यातील सिहावल चौकीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला लागले. ऑनलाईन गेम खेळताना हा मुलगा व महिला एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रियकराच्या प्रेमात वेडी झालेली ही  महिला दोन्ही मुलांना घेऊन थेट मुलाच्या घरी आली. मुलाचे घरातील सदस्य महिलेला घरात ठेवण्यास तयार नव्हते. हे प्रकरण पोलिसां पर्यंत गेले. पोलिसांनी येऊन आणि गावकऱ्यांनी  महिलेची समजूत काढून तिला परत तिच्या घरी पाठवले. या प्रकरणामुळे गावात खळबळ उडाली आहे.  

 Edited by - Priya Dixit