शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 20 एप्रिल 2019 (17:10 IST)

आधाराशी मोबाईल नंबर लिंक करा आणि जाणून घ्या त्यातून होणारा फायदा

आधार कार्ड हा भारतीय नागरिकांचे महत्त्वाचे ओळखपत्र आहे. यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) हे सुरक्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. आधार कार्डमध्ये व्यक्तीच्या बायोमेट्रिक ओळखीशिवाय त्याची वैयक्तिक माहिती राहते.
 
UIDAI आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर जोडण्यासाठी काम सुरू केलं आहे. प्रश्न उद्भवतो की शेवटी मोबाइल नंबर जोडले जात आहे आणि हे किती महत्त्वाचे आहे? आधार धारकांना यातून काय फायदे मिळेल?
 
UIDAI वर दिलेल्या माहितीनुसार पैसे फसवणूक प्रकरणांमध्ये हे समोर आलं आहे की गुन्हेगार आणि दहशतवादी फेक सिम कार्ड्सचा वापर करून फसवणूक आणि गुन्हा करतात. बर्‍याचवेळा निष्पाप लोकांच्या नावाने त्यांना न कळत सिम कार्ड घेऊन घेतात. येथे प्रत्येक मोबाइल नंबर सत्यापित केला जाईल नंतर गुन्हेगार, गद्दार पकडले जाऊ शकतील. मग जर आपण आपला मोबाइल नंबर आधाराशी नाही जुळवला तर ते लगेच जोडून घ्या. आधार कार्डशी मोबाइल नंबर जोडल्याने आपल्याला त्याच्या अपडेटची सूचना देखील मिळत राहील. 
 
ज्या दूरसंचार कंपनीचे सिम आपल्याकडे आहे, त्याच्या आउटलेटवर जाऊन आपण आधारला सिम नंबरसह लिंक करवू शकता. जर आपल्या आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर नसेल तर आपण UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा बँक आणि पोस्ट ऑफिस मध्ये स्थापन केलेल्या आधार केंद्रांवर जाऊन आधारामध्ये आपले मोबाईल नंबर जोडू शकता.