1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (19:49 IST)

शहनाजच्या वडिलांनी हातावर शहनाजच्या नावाचं टॅटू काढले

2 सप्टेंबर रोजी अभिनेता तसेच ‘बिग बाॅस 13’विजेता सिद्धार्थ शुक्लाने अखेरचा श्वास घेतला. या घटनेनं सर्वांच्या मनाला सुन्न करुन टाकलं. बिग बाॅसमधये असताना सिद्धार्थ आणि अभिनेत्री शहनाज गिलची जोडी लोकांच्या प्रचंड पसंतीस आली होती. एवढंच नाही तर शहनाज सिद्धार्थ शिवाय एक मिनिटसु्द्धा राहू शकत नव्हती हे लोकांच्या नजरेस आलं.
 
सिद्धार्थच्या जाण्यानंतर शहनाजला मोठा धक्का बसला आहे. तिची प्रकृती देखील खराब झाली आहे. काही दिवसांपुर्वी अभिनेता आणि बिग बाॅस फेम अभिनव शुक्लाने शहनाजला भेट दिली होती.     यावेळी ती हळूहळू नीट होत असल्याचं अभिनवने सांगितलं होतं.
 
शहनाजच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी शहनाजच्या वडिलांनी युक्ती लढवली आहे. यावेळी शहनाजच्या वडिलांनी त्यांच्या हातावर शहनाजचं नावाचं टॅटू रेखाटलं आहे. यामध्ये त्यांनी हात जोडलेले आहेत. तसेच खाली गुलाबाचं फुल देखील काढलं आहे. अर्थातच जोडलेल्या हातांच्या आणि गुलाबाच्या फुलाच्यामध्ये शहनाज नाव लिहिलं आहे.
 
दरम्यान, सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाज कोणासोबतही बोलत नसून ती जेवणही करत नाही. तसेच सिद्धार्थने तिच्या हातावर जीव सोडल्याने तिला मोठा धक्का बसला आहे. याबाबत तिच्या वडिलांशी बोलताना त्याने माझ्या हातात जीव सोडला, मी कस जगू, असं शहनाजने म्हटलं आहे.