शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (13:53 IST)

धक्कादायक ! तरुणाने चक्क संपूर्ण नोकिया 3310 मोबाईल गिळला

नवी दिल्ली : एका माणसांवर ज्याने संपूर्ण नोकिया 3310 मोबाईल फोन गिळला,त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे.कोसोवोतील प्रिस्टीना येथील राहणाऱ्या एका तरुणाने चक्क नोकिया कंपनीचे सुरुवातीच्या काळातील 2000 सालातील बनलेल्या नोकिया 3310 फोन ला गिळले होते.
 
नोकिया फोनचे हे मॉडेल जे 2000 साली लॉन्च केले होते आणि ते 'ईट'फोन या नावाने ओळखले जात असे.हे फोन गिळल्यावर फोन त्या तरुणाच्या पोटात अडकून गेले.त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.स्कॅन केल्यावर डॉक्टर रिपोर्ट बघून हादरले.त्या तरुणाच्या पोटात चक्क मोबाईल फोन असल्याचे आढळले.फोन मोठा असल्यामुळे पचनास शक्य नव्हता.आणि फोनच्या बेटरी मधील हानिकारक रसायनांमुळे तरुणाच्या जीवाला धोका होता.
 
मोबाईल फोन तीन भागात वाटला गेला -
सुदैवाने त्या माणसांवर केलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि ऑपरेशन करून त्याच्या पोटातून मोबाईल फोन काढण्यात आले.डॉक्टरांनी स्थानिक मीडियाला सांगितले की ,मला एका रुग्णाच्या संदर्भात फोन आला की त्याने कोणती तरी वस्तू गिळली आहे.स्कॅन केल्यावर बघितले तर त्याने मोबाईल फोन गिळला होता आणि हा फोन तीन भागात वाटला गेला होता.
 
तरुणाने फोन का गिळले हे सांगितले नाही-
या सर्व प्रकरणांमध्ये रुग्णाला सर्वात जास्त धोका मोबाईलच्या बॅटरी पासून होता. कारण या बॅटरीचा स्फोट कधीही होऊ शकत होता. ते म्हणाले की हा तरुण पोट दुखण्याची तक्रार घेऊन रुग्णालयात आला होता.
 
डॉक्टरांनी सांगितले की,या तरुणाने मोबाईल का गिळले हे सांगितले नाही.एका छोट्याश्या कॅमेऱ्याने रिकॉर्ड करून एका क्लिप मध्ये डॉक्टर आणि त्यांच्या संपूर्ण दलाला त्या रुग्णाच्या पोटातून फोन शोधताना आणि काढताना दाखवले आहे.या शस्त्रक्रियेत या डिव्हाइसला काढण्यासाठी सुमारे 2 तासाचा वेळ लागला.