रविवार, 19 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: रविवार, 5 सप्टेंबर 2021 (15:16 IST)

दवाखान्यात शिरलं भूत व्हिडीओ व्हायरल झाला

The ghost video that went viral in the hospital went viral Marathi Lokpriya News In Marathi Webdunia Marathi
डॉक्टरला जीवनदाता म्हटले जाते,परंतु एका रुग्णालयात एका रुग्णाने डॉक्टरला भूत समजून गोंधळ घातला. एका रुग्णालयात एका रुग्णाने चक्क डॉक्टरलाच भूत समजले.

ही गोष्ट आहे कोरोना काळातली कोरोना बाधित रुग्णांच्या रुग्णालयात डॉक्टर्स पीपीई किट घालून रुग्णांची सेवा सुश्रुषा करत असताना एक गमतीशीर गोष्ट घडली आहे.सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
 
पीपीई किट घालून डॉक्टर रुग्णाच्या जवळ जातातच एक महिला डॉक्टर ला अशा वेशात बघून चक्क भूत भूत करून ओरडू लागली.तिचे ओरडणे ऐकून आजू-बाजूचे झोपलेले रुग्ण हादरून खळबळून जागे होतात.हा सर्व गोंधळ बघून इतर डॉक्टर्स देखील त्या महिलेची समजूत काढण्यासाठी येतात.हा सर्व प्रकार रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कैमेरात कैद झाला असून सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.