गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 डिसेंबर 2018 (08:54 IST)

अहमदाबादमध्ये लिंगबदल शस्त्रक्रियेत पाच वर्षांमध्ये दुप्पटीने वाढ

गुजरातमधील अहमदाबाद शहरामध्ये लिंगबदल शस्त्रक्रिया करुन घेणाऱ्यांची संख्या मागील पाच वर्षांमध्ये दुप्पटीने वाढली आहे. अहमदाबादमधील वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पाच वर्षांपूर्वी शहरामधील लिंगबदल शस्त्रक्रियांची संख्या चार ते पाच इतकीच होती. मात्र आता हाच आकडा वर्षाला दहा शस्त्रक्रिया इतका झाला आहे. विशेष म्हणजे हा आकडा संपूर्ण गुजरात राज्याचा नसून केवळ अहमदाबाद शहराचा असल्याने राज्यातील आकडेवारी यापेक्षा जास्त आहे.
 
अहमदाबादचे लोकप्रिय प्लॅस्टिक सर्नज डॉ. पीके बिलवानी यांनी १९७७ पासून आत्तापर्यंत ४७ जणांवर लिंगबदल शस्त्रक्रिया केली आहे. तसेच आणखीन पाच जणांवर लवकरच ते ही शस्त्रक्रिया करणार आहेत. या लिंगबदल शस्त्रक्रियेबद्दल माहिती देताना बिलवानी सांगतात, ‘मागील काही वर्षांमध्ये लिंगबदल शस्त्रक्रियांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे.’ बिलवानी यांच्या मताशी मनसोपचारतज्ञ डॉ. अमृत बोदानीही सहमत असून वर्षभरामध्ये मी १० जणांना लिंगबदल शस्त्रक्रियेसंदर्भात प्रबोधन केल्याची माहिती  दिली आहे.