मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जून 2020 (08:12 IST)

गुगल मॅपवर आता अमिताभ बच्चन यांचा आवाज

गुगल मॅपवर आता महानायक अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकू येणार आहे. गुगल सध्या ऑडिओ फॉर्ममध्ये पत्ता सांगणाऱ्या अॅप्लिकेशनवर काम करत आहे. या अॅप्लिकेशनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे सॉफ्टवेअर असेल. या सॉफ्टवेअरच्या ऑडिओ फॉर्मला अमिताभ यांचा आवाज दिला जाणार आहे. या नव्या प्रकल्पावरुन बिग बी आणि गुगल यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरु आहे. तसेच गुगलने त्यांच्या आवाजासाठी कोट्यवधींचे मानधन देऊ केले  आहे.
 
अमिताभ बच्चन अभिनयासोबतच त्यांचा आवाजही तितकाच लोकप्रिय आहे. आजवर अनेक चित्रपट, मालिका, जाहिरातींमध्ये बिग बींच्या आवाजाचा वापर करण्यात आला आहे. अनेक स्टँडअप कॉमेडियन त्यांच्या आवाजाची नक्कल करुन विनोद करतात. त्यामुळे इतका लोकप्रिय आणि देशवासीयांना ओळखीचा असलेला आवाज गुगलने वापरण्याचा निर्णय घेतला आहे.