रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 10 जून 2020 (20:34 IST)

Life after Corona : लॉक डाउन असो वा अनलॉक, पुढील एक वर्ष जगण्याची पद्धत बदलावी लागणार

किमान वर्षभर तरी कोरोनासोबत नवे आयुष्य जगण्यासाठीचा 21 गोष्टी गाठ बांधून घ्या...
संपूर्ण जग कोरोनाच्या विषाणूला झुंज देत आहे. कुठे हे संपले आहे तर कुठे अजून देखील ह्याने थैमान मांडले आहे. पण आयुष्य यासाठी जगणे थांबू शकत नाही. जग देखील कायमस्वरूपी बंद राहू शकत नाही. आपल्याला या मधून बाहेर पडावे लागणारच. आपल्याला कोरोनासह जगणे शिकावे लागणारच. 
 
अश्या परिस्थितीत इंडियन काँसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आईसीएमआर) ने एक महत्त्वाचे मार्गदर्शक सूचनापत्रक जारी केले आहे त्यानुसार आपल्या शहरात लॉक डाउन असो किंवा नसो आपल्याला या 6 महिन्यापासून ते येत्या वर्षापर्यंत जगण्याच्या सवयी बदलाव्या लागणार. 
 
जाणून घेऊ या की आयसीएमआरचे नवे मार्गदर्शक काय आहे आणि त्याचे अनुसरण कसे आणि किती काळ करावयाचे आहे. आयसीएमआरने आपल्या नव्या नियमांमध्ये नव्या आयुष्याचा 21 स्रोतांना समाविष्ट केले आहे.
 
1 किमान 2 वर्ष तरी परदेश वारी करावयाची नाही. किमान 1 वर्ष बाहेरचे काहीही खाऊ नये.
2 कोणत्याही लग्न समारंभात सामील होऊ नये.
3 देशामध्ये देखील अनावश्यक प्रवास करू नये.
4 वर्षभर तरी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
5 सामाजिक अंतर पूर्ण पणे पाळावे.
6 सर्दी खोकला असणाऱ्यांपासून लांबच राहावं.
7 चेहऱ्यावर मास्क नेहमीच ठेवावा.
8 या वर्तमान परिस्थितीत सावधगिरी बाळगावी.
9  इतर कोणास आपल्या जवळ येऊ देऊ नका.
10 वर्षभर शाकाहारचं खावे.
11 किमान 6 महिने सिनेमा मॉल किंवा वर्दळीच्या ठिकाणी, बाजारपेठेत जाऊ नये. बाग किंवा कोणते ही समारंभात जाऊ नका.
12 आपल्या प्रतिकारक शक्तीला बळकट करावयाचे आहे.
13 सलून किंवा सौंदर्यप्रसाधनात (ब्युटी पार्लर) मध्ये जाताना सावधगिरी बाळगा.
14 कोणत्याही माणसाशी अनावश्यक भेट करू नका.
15 लक्षात ठेवा की कोरोनाचे विषाणू लवकरच जाणार आहे.
16 बाहेर जाताना घड्याळ, अंगठी आणि बेल्ट वापरू नये.
17 टिशू पेपर आणि सेनेटायझर आपल्या जवळ नेहमीच बाळगावे.
18 बाहेरावरून आल्यावर आपले जोडे पादत्राण बाहेरच ठेवावे.
19 बाहेरावरून जाऊन आल्यावर आपले हात पाय धुऊन घ्या किंवा अंघोळ करा.
20 ज्यावेळी आपल्याला वाटेल की आपण एखाद्या संक्रमिताच्या संपर्कात आला आहात तर त्वरित स्नान करावे आणि डॉक्टरांशी संपर्क साधावे.
21 या सर्व नियमांना किमान वर्षभर तरी गाठ बांधून ठेवा.