चिमुकल्याचा गणपती बाप्पाला निरोप देतानाचा भावपूर्ण व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर अलीकडे खूप व्हिडीओ व्हायरल होतात, त्यापैकी काही भावविभोर करणारे असतात. युजर्स कोणत्याही सणाचे व्हिडीओ देखील शेअर करत असतात. सध्या सोशल मिडीयावर गणपतीचे व्हिडीओ शेअर केले जात आहे. गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून काहींच्या घरातील दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले असून त्याचे व्हिडीओ देखील लोकांनी शेअर केले आहे. असाच एक गणपती विसर्जनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक चिमुकला बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी बाप्पाचे विसर्जन होऊदेत नाहीए. तो बाप्पाला घरात ठेवण्यासाठी रडत आहे किंचाळत आहे. तो चिमुकला आपले सर्व सामर्थ्य लावून बाप्पाच्या मूर्तीला विसर्जनापासून रोखत आहे. तो आपल्या वडिलांना बाप्पाच्या मूर्तीला विसर्जन करण्यापासून रोखतो आहे
बाप्पा नेहमी आपल्यासोबत राहावे त्याने कधीही आपल्याला सोडून जाऊ नये ही त्यामागची त्या चिमुकल्याची भावना आहे. तो बाप्पाला आपली शक्ती लावून स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याची आई त्याला समजवण्याचा प्रयत्न करते परंतु तो कोणाचे ऐकतच नाही. नंतर त्याच्या कडून मूर्ती घेतल्यावर तो रडू लागतो. हा व्हिडीओ गणेश ऑफिशिअल पार्गी या इंस्टाग्राम अकाऊंट वरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे माहित नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या चिमुकल्याचा निरागस पणा सर्वाना आवडला आहे.