1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 4 ऑक्टोबर 2018 (09:38 IST)

अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढल्या

Anil Ambani
अनिल अंबानी व त्यांच्या दोन वरिष्ठ सहकाऱ्यांना देशाबाहेर जाऊ देऊ नका, अशी विनंती एरिक्सन या मोबाइल कंपनीने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. अनिल अंबानी यांच्या आरकॉम या कंपनीने एरिक्सनचे ५५० कोटी देणे आहे. त्यासाठी एरिक्सनने आॅक्टोबरची मुदत दिली होती.पण आरकॉमने ही रक्कमही परत केली नाही. त्यामुळे कंपनीने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
 
दरम्यान, यापूर्वी देशातील मोठे उद्योजकबँकांचे कर्ज बुडवून फरार झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एरिक्सनने ही याचिका दाखल केली आहे.