बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 सप्टेंबर 2018 (08:37 IST)

अनुप जलोटा यांना अच्छे दिन, एफ.टी.आयच्या संचालक पदी तर कंगना ....

तरून प्रेमिकेमुळे चर्चेत असलेले भजन गायक अनुप जलोटा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सरकारने 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'च्या (FTII) संचालकपदी  गायक अनुप जलोटा यांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सूचनांनुसार जलोटा यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. असून त्यांच्या बरोबर ‘एफटीआयआय सोसायटी’वर चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांची नियुक्ती सुद्धा केली आहे. अभिनेत्री कंगना रणौत, ज्येष्ठ अभिनेते डॅनी डॅन्झोप्पा, अभिनेत्री दिव्या दत्ता यांच्यासह अनेक नामवंतांचा यामध्ये समावेश आहे.‘एफटीआयआय सोसायटी’आणि नियामक मंडळ तसेच शैक्षणिक परिषदेच्या नियुक्त्या मागील अनेक महिन्या पासून रखडल्या होत्या. ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी अभिनेते अनुपम खेर यांची नियुक्ती झाल्यानंतर अकरा महिन्यांनी या नियुक्त्या झाल्या आहेत. मात्र निवड प्रक्रिया उशीरा झाल्यामुळे यांच्याकडे कार्यभार फक्त अठरा महिन्यांसाठी राहणार आहे.