शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 8 ऑगस्ट 2018 (15:40 IST)

फोटोमुळे अनुष्का शर्मा झाली ट्रोल

इंग्लंडविरोधात कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ सध्या लंडनमध्ये आहे. यावेळी संघाने लंडनमधील भारतीय दूतावासाला भेट दिली. या भेटीच्या वेळी खेळाडूंचा व दूतावासातील अधिकाऱ्यांचा एकत्र फोटो काढण्यात आला. तो फोटो बीसीसीआायने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र या फोटोवरून नेटकरी प्रचंड संतापले असून त्यांनी बीसीसीआय सोबत कर्णधार विराट कोहलीची बायको अनुष्का शर्माला देखील ट्रोल केले आहे.
 
या फोटोमध्ये अनुष्का शर्मा ही विराट कोहलीसोबत फोटोच्या मध्यभागी पहिल्या रांगेत दिसत आहे तर संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे हा चौथ्या रांगेत उभा दिसतोय. अनुष्काला मिळालेल्या या खास वागणूकीचा तर अजिंक्य सोबत झालेल्या या अन्यायाचा नेटकऱ्यांनी खरपूस समाचार घेत बीसीसीआय आणि अनुष्काला ट्रोल केले आहे. विराट कोहली हा लंडनमध्ये हनीमूनला आला आहे का, असा देखील सवाल नेटकऱ्यांकडून केला जात आहे.