1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जुलै 2018 (08:58 IST)

अहो आश्चर्यम, देशात सापडला दुर्मीळ रक्तगट

blood gruop
कर्नाटकातील मणिपाल येथील कस्तुरबा वैद्यकीय महाविद्यालयात एक दुर्मीळ रक्तगटाची व्यक्ती सापडली आहे. या रक्तगटाचे नाव पीपी अथवा पी नल फेनोटाईप असे आहे. असा रक्तगट असलेली ही देशातील पहिलीच व्यक्ती आहे.  
 
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एका रुग्णाला रक्ताची तातडीने गरज होती.कस्तुरबा रुग्णालयातील ब्लड बँकेत रुग्णाचा रक्तगट माहित करून घेण्यासाठी सॅपल पाठवले. डॉक्टरांनी रक्त तपासले मात्र त्यांना रक्तगटाबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर डॉक्टरांनी एका पाठोपाठ एक असे 80 वेळा सॅपल पाठवले. पण रुग्णाच्या रक्तगटाचा काही शोध लागला नाही. या प्रकारामुळे डॉक्टरांना देखील आश्चर्य वाटले. संबंधित रुग्णाच्या रक्तगटाचा शोध लावण्यासाठी रक्तासंदर्भातील आजारांची देखील तपासणी व चौकशी झाली. या कामासाठी डॉक्टरांचे एक पथकच कामाला लागले होते. पण त्याच्या हाती काहीच लागले नाही. 
 
शेवटी डॉक्टरांनी त्या रुग्णांचे रक्त तपासणीसाठी इंटरनॅशनल ब्लड ग्रुप रेफरेंस लॅबरोटरी (आयबीजीआरएल) ब्रिस्टर, इंग्लंड येथे पाठवले. या लॅबने संबंधित रुग्णाच्या रक्ताचा गटाचा शोध लावला. हे रक्तगट पीपी फेनोटाइप सेल्स या नावचे असल्याचे लॅबने सांगितले.