शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

तिची चक्क सिंहासोबत जमलीय गट्टी

जंगलाचा राजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंहाला पाहून भल्याभल्यांचा थरकाप होतो. मात्र एक महिला अशीही आहे, ती चक्क सिंहासोबत राहते. एवढेच नाही तर रात्री त्याच्यासोबत एकाच बिछान्यावर झोपते. ही महिला अन्य कुणी नाही तर हॉलिवूडची प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री मेलानी ग्रिफिथ ही आहे. तिने आपल्या घरी एक सिंह पाळला आहे. त्याच्यासोबत संपूर्ण दिवस ती धमालमस्ती करत असते. खरे म्हणजे 1970 मध्ये मेलानी शाळेत शिकत होती. त्यावेळी तिच्या आईवडिलांनी तिला एक छोटासा सिंहाचा बछडा भेटरुपात दिला होता. तेव्हापासून मेलानीने त्याला स्वतःच्या मुलाच्या मायेने वाढविले. या सिंहाला मेलानीने नील असे नाव दिले आहे. नील व सिंहातील नाते पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. मेलानीला सिंहांचे आकर्षण पूर्वीपासूनच होते. ज्यावेळी तिला छोटा आफ्रिकन सिंह भेट मिळला तेव्हा तिला प्रचंड आनंद झाला होता. मेलानीने त्या सिंहासोबत आपले जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे. सिंह व मेलानीला एकत्र पाहून सगळेच थक्क होतात आणि त्यांची परस्परांतील मैत्री पाहून विश्र्वासही ठेवू शकत नाहीत. मेलानी ग्रिफिथने हॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलेले असून अनेक पुरस्कारही मिळविले आहेत. आता तिने साठी पार केली असून आताही ती त्याच उत्साहाने काम करते.