शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 16 जुलै 2018 (10:19 IST)

रेल्वेतही शॉपिंग करा, पहील्यांदाच प्रयोग

आता विमानातील सुविधेच्या धर्तीवर रेल्वेतही विविध वस्तूंची विक्री केली जाणार आहे. मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये प्रवाशांना यापुढे विमानाप्रमाणे शॉपिंगचा आनंद घेता येणार आहे. आठवडाभरात याकरिता निविदा काढण्यात येणार आहेत. ऑनलाइन किंवा रोखीने प्रवाशांना वस्तूंची खरेदी करता येईल. 
 
रेल्वेचे उत्पन्न वाढावे यासाठी यापूर्वी रेल्वेने प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या बेडशीटच्या कव्हरवर जाहिराती छापणे सुरू केले आहे. पहिल्यांदाच हा प्रयोग केला जात आहे. मध्य रेल्वेत प्रवासी सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. 
 
कोणार्क एक्‍स्प्रेस, चेन्नई एक्‍स्प्रेस आणि एर्नाकुलम दुरांतो एक्‍स्प्रेस या तीन गाड्यांच्या वातानुकूलित गाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू केली जाईल. विविध वस्तू विक्रीसाठी एका ट्रॉलीमध्ये मांडण्यात येतील. हा प्रयोग यशस्वी झाल्यास लांब पल्ल्यांच्या इतर गाड्यांमध्येही ही सुविधा दिली जाईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.