शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

टूरिस्ट बसेसवर पॉर्न कलाकारांची छायाचित्रे

केरळमधील एका टूरिस्ट बसेसवर पॉर्न कलाकारांची छायाचित्रे रेखाटली आहेत. यावरुन सोशल मीडियात नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय सुरु झाला आहे. रेखाटलेल्या छायाचित्रांमध्ये पॉर्न स्टार मिया खलिफा, केरन ली, जॉनी सिन्स, जॉर्डी इल निनी आणि कौर्टनी केन यांचा समावेश आहेत. याशिवाय एकेकाळी पॉर्न स्टार म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओनी हिचे सुद्धा छायाचित्र रेखाटले आहे.  
 
चिकोस टूर अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या बसेसवर ही छायाचित्रे रेखाटली आहेत. नेटिझन्स याबाबतील वेगवेगळे तर्कवितर्क लढवत आहेत. तर काहीजण या बसेसचे फोटो सोशल मीडियात शेअर करत आहेत. 29 जूनला या बसेसचे फोटो सुरुवातील ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आले होते. त्यानंतर हे फोटो व्हायरल झाले.