शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

अशाप्रकारे मानवी आवाजाची नक्कल करू शकतो पोपट

पोपटाच्या तोंडी मानवी बोली ऐकून हा पक्षी अखेर कशामुळे असे करू शकतो, असा सवाल मनात उभा राहतो. शास्त्रज्ञही त्याचे उत्तर जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. आता भारतीय शास्त्रज्ञांच्या एका ताज्या अध्ययनात पोपट व कावळ्यासारख्या पक्ष्यांच्या ध्वनीचे अनुकरण करण्याच्या क्षमतेची तुलना मानवासोबत केली असता विविध महत्त्वाची तथ्ये सोर आली आहेत. 
 
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, मानव, कावळा व पोपटाच्या स्वरतंत्रातील कार्डिनल स्वरांचे स्थान वेगवेगळे असते. म्हणजे तिन्ही जीव उच्चारणासाठी भिन्न धवन्यात्क क्षेत्रांचा वापर करतात. मात्र त्यांच्या धवन्यात्मक क्षेत्रांचा आकार सारखा असतो. मानवात कार्डिनल स्वर स्थानादरम्यानचे अंतर पोपट व कावळ्यापेक्षा जास्त आढळून आले. पोपटामध्ये मात्र कार्डिनल स्वर स्थानादरम्यानचे अंतर कमी दिसून आले. मनुष्याची नक्कल करण्यासाठी पोपटाची जिभेला मॉड्युलेशन करण्याची क्षमता लक्षात घेऊन त्याच्या स्वर तंत्राची रचना जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात असे दिसून आले की, चोच वगळता पक्ष्यांचे ध्वनीनिर्मिती करणारे अवयव मनुष्याप्रमाणेच असतात. फुफ्फुस, श्र्वसननलिका, स्वर तंत्र, तोंड व चोच पक्ष्यांचे प्रमुख ध्वनी उत्पादक अवयव असतात, ते त्यांना उच्चारणासाठी मदत करतात.