शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जून 2022 (12:24 IST)

VIDEO मेहुणीला वरमाला घालली, नवरदेवाची भरमंडपात धुलाई

wedding viral video
लग्नाचे अनेक फनी व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. पण आता असाच एक VIDEO व्हायरल होत आहे ज्यात नवरीच्या बहीणीने नवरदेवाची धुलाई केली. 
 
एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्याला बघून हसावं की राग करावा हेच कळणार नाही. यात मेहुणीने नवरदेवाची भरमंडपातच धुलाई केली. खरं म्हणजे कारणही तसंच आाहे. या व्हिडिओत नशेत नवरदेवाने चक्क नवरीच्या बहिणीच्या गळ्यात वरमाला घातली. त्यामुळे मेहुणी संतप्त झाली आणि तिने त्याला चांगलीच अद्दल घडवली.
 
व्हिडीओत स्टेजवर नवरा-नवरी, नवरदेवाचा मित्र आणि नवरीची बहीण दिसत आहे. नवरदेव इतका दारु प्यायला दिसत आहे की तो सतत डुलताना दिसतोय आणि त्यांना मित्राने टेका देऊन उभे ठेवले आहे. नवरदेव इतकी दारू प्यायला आहे की उभंही राहता येत नसल्यामुळे वरमाला घालण्यासाठी मित्राने त्याला पकडलं आहे. सोमर नवरी आणि तिच्या शेजारी तिची बहीण नवरा-नवरीला वरमाला देते. नंतर नवरी नवरदेवाला वरमाला घालते आणि जेव्हा नवरदेवाची वरमाला घालण्याची वेळ येते तेव्हा तो नशेत नवरीऐवजी मेहुणीलाच वरमाला घालतो.