सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : गुरूवार, 26 मे 2022 (13:26 IST)

VIDEO प्लॅटफॉर्मवर प्रवाशांचा गरबा : ट्रेन वेळेपूर्वी रतलाम पोहोचली, प्रवाशांनी केला गरबा

Ratlam station garba viral
रतलाममधील प्रवाशांच्या डान्सचा मजेदार व्हिडिओ समोर आला आहे. रेल्वे स्थानकाच्या प्लेटफॉर्मवर गरबा करून प्रवाशांनी टाइमपास केला. ओढ़नी उड़ी-उड़ी जाए ... आणि इतर बॉलीवूड हिट गाण्यांवर, ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या ग्रुपने अशा डान्स मूव्ह दाखवल्या की इतर प्रवासीही त्यांना पाहून थक्क झाले.
 
रतलाममधील रेल्वे स्टेशनचा काल रात्रीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रतलाम स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर प्रवासी गरबा करताना दिसत आहेत. इतके लोक एकत्र गरबा करताना पाहून इतर लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवला आणि व्हायरल केला.
 
हे सर्व प्रवासी रात्री वांद्रे हरिद्वार ट्रेनने केदारनाथला जात होते. ट्रेन 20 मिनिटे आधी रतलाम स्टेशनवर पोहोचली. अशा परिस्थितीत गुजरातच्या प्रवाशांचा हा ग्रुप रतलाम स्थानकावर उतरला आणि गरबा करु लागला, मात्र स्थानकावर प्रवाशांना असा गरबा करताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले, तर लोकांची करमणूकही झाली.