1 तासाभरात ही थाळी संपवा, नवी बुलेट जिंका

bullet thali pune Maharashtra
Last Modified शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (12:40 IST)
याला खवय्यांसाठी एक सुवर्णसंधी असेच म्हणावे लागणार आणि त्यातून जर आपल्याला रॉयल एन्फिल्ड बुलेटची आवड असेल तर मग नक्कीच हे चॅलेज आपल्यासाठी फायद्याचे ठरेल.
पुण्यातील एका रेस्टॉरंटने एक थाळी एक तासभरात संपल्यावर चक्क बुलेट जिंकण्याची ऑफर दिली आहे. वडगाव मावळमधील शिवराज हॉटेलने विराट ‘बुलेट थाळी’ एका तासात संपवा आणि बुलेट बाईक जिंका अशी ऑफर दिली आहे.

हॉटेल मालकांनी आपल्या हॉटेलबाहेर ५ नव्या बुलेटही उभ्या केल्या आहेत. या ऑफर अंतर्गत सुमारे 1 लाख 65 हजार रुपयांची बुलेट ‍जिंकण्यासाठी आपल्याला भव्य थाळी तासभरात फस्त करावी लागेल. बुलेट थाळीची किंमत ४ हजार ४४४ रुपये इतकी आहे. या ऑफरमुळे हॉटेलला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे.
आतापर्यंत सोलापूर रहिवासी सोमनाथ पवार बुलेट थाळी स्पर्धेचे विजेते ठरले आहेत. त्यांनी चार किलो वजनाची थाळी एका तासाच्या आत फस्त केली.

यापूर्वी आठ किलोची रावण थाळी चौघांनी 60 मिनिटात संपवण्याचं आव्हान शिवराज हॉटेलमध्ये होतं. विजेत्याला पाच हजार रुपयांचं रोख पारितोषिक मिळणार होतंच, शिवाय विजेत्यांना थाळीसाठी एक रुपयाही मोजावा लागणार नव्हता.

काय आहे बुलेट थाळी डबल चॅलेंज
या थाळीत तब्बल बारा पद्धतीच्या वेगवेगळ्या डिश आहेत. हे पदार्थ तयार करण्यासाठी चार किलो मटण आणि मासे वापरले जातात. 55 जण ही थाळी तयार करतात.
बुलेट थाळी मध्ये पापलेट, सुरमई, चिकन लेग पीस, कोलंबी करी, मटन मसाला, चिकन फ्राय, कोळंबी बिर्याणी, भाकरी, रोटी, सुकट, कोलंबी कोळीवडा, रायता, सोलकडी, रोस्टेड पापड, मटण अळणी सूप एवढे पदार्थ देण्यात येत आहे.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

काय सांगता ,70 हजार कमविण्याची संधी

काय सांगता ,70 हजार कमविण्याची संधी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशावर आर्थिक संकटाचे सावट आहेच कित्येक लोकांनी या साथीच्या ...

लक्षद्वीप वाद : आयेशा सुल्ताना कोण आहेत? त्यांच्यावर का ...

लक्षद्वीप वाद : आयेशा सुल्ताना कोण आहेत? त्यांच्यावर का दाखल झाला देशद्रोहाचा खटला?
इम्रान कुरेशी देशद्रोहासंबंधी कायद्याच्या सीमा ठरवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं ...

'कोणी कितीही रणनीती आखली तरी 2024 मध्ये देखील नरेंद्र मोदीच ...

'कोणी कितीही रणनीती आखली तरी 2024 मध्ये देखील नरेंद्र मोदीच येणार' - देवेंद्र फडणवीस
'कोणी कितीही रणनीती आखली तरी आजही नरेंद्र मोदीच आहेत आणि 2024 मध्ये देखील नरेंद्र मोदीच ...

मोटर न्यूरॉन : जास्त व्यायाम केल्याने वाढू शकतो या आजाराचा ...

मोटर न्यूरॉन : जास्त व्यायाम केल्याने वाढू शकतो या आजाराचा धोका
जेम्स गॅलाघर वैज्ञानिकांच्या मते जनुकीय किंवा अनुवांशिकदृष्ट्या धोका असणाऱ्या गटातील ...

नरेंद्र मोदी यांचा विकसित देशांपेक्षाही वेगाने लसीकरण ...

नरेंद्र मोदी यांचा विकसित देशांपेक्षाही वेगाने लसीकरण केल्याचा दावा कितपत खरा? - फॅक्ट चेक
किर्ती दुबे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (7 जून) कोरोना संकटाच्या काळात ...