मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (22:01 IST)

सिरमच्या त्याच इमारतीत पुन्हा एकदा एका कम्पार्टमेंटमध्ये आग लागली

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या ज्या इमारतीला दुपारी आग लागली होती. त्याच इमारतीत संध्याकाळी पुन्हा एकदा एका कम्पार्टमेंटमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळावर धाव घेत आग विझवली आहे. एएनआय वृत्त संस्थेनं याबाबतची माहिती ट्विट केली आहे. 
 
पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ज्या ठिकाणी दुपारी आग लागली होती. त्याच ठिकाणी एका कन्पार्टमेंटमध्ये आग लागली होती. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती एएनआयने दिली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले वआगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. ज्या ठिकाणी दुपारी आग लागली त्याच ठिकाणी पुन्हा आग लागल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.