मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (21:46 IST)

विराट आणि अनुष्का वांद्रे येथील क्लिनिक मध्ये गेले

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. विराट कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतः ही बातमी शेअर केली. त्यांनतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. दरम्यान, प्रसूतीच्या 10 दिवसानंतर अनुष्का आणि विराट वांद्रेमध्ये दिसले. विराट आणि अनुष्का वांद्रे येथील क्लिनिक मध्ये गेले होते. जिथे मीडियाने अनुष्का आणि विराटच्या संमतीने दोघांचे फोटो क्लिक केले. त्याचवेळी अनुष्काने मीडियाच्या कर्मचार्‍यांचे गोपनीयतेची काळजी घेतल्या बद्दल त्यांचे आभार मानले.
 
फोटोमध्ये  दोघांनीही कोरोना साथीला ध्यानात घेऊन मास्क घातले आहेत. परंतु ते आनंदी दिसत आहे. यावेळी विराटने ब्लॅक कलरचा आउटफिट परिधान केला आहे, त्याच अनुष्काने डेनिम लुक कॅरी केला आहे. अनुष्का आणि विराटने एकमेकांचा हात धरला आहे. महत्वाचे म्हणजे प्रसूतीनंतरही अनुष्का तितकी फिट दिसत होती, जशी ती तिच्या गरोदरपणापूर्वी होती. त्यांचे हे फोटोज इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहेत. चाहते लाईक्स आणि कमेंट्सद्वारे आपले प्रेम व्यक्त करत आहेत.