रविवार, 15 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : सोमवार, 9 जानेवारी 2023 (14:26 IST)

Amruta Fadanvis अमृता फडणवीस यांनी दिले डान्स करण्याचे चॅलेंज

amruta fadnavis
Twitter
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी  अमृता फडणवीस यांनी नुकताच त्यांचा 'आज मैंने मूड बना लिया ए ए ए , तेरे नाल ही नचना वे' या त्यांच्या गाण्यावर डान्स करत एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या या गाण्याला लोकांकडून मोठी पसंती मिळत आहे.  या गाण्याच्या प्रमोशन साठी आता त्यांनी समाजमाध्यमांवर सर्वाना एक आवाहन केले आहे. तुमच्याकडे काय आहे ते आम्हाला दाखवा! असं अमृता फडणवीस यांनी आपल्या चाहत्यांना एक चॅलेंज दिले आहे.
अमृता फडणवीस यांनी अत्यंत कमी कालावधीत संगीत शेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मग त्यांना अनेक वेळा समाजमाध्यमांवर ट्रोल करण्यात आलं. पण या ट्रोल गँगकडे त्यांनी कधीही लक्ष दिल नाही. त्यांचं नुकताच प्रदर्शित झालेलं 'मूड बना लेया वे' हे पंजाबी गाणे प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे.  

6 जानेवारी रोजी अमृता फडणवीस यांचे हे नविन गाण प्रदर्शित झाले. गाण प्रदर्शित झाल्यापासून गाण्याला आत्तापर्यंत 21 मिलियन इतक्या लोकांनी पाहिलं आहे. या नव्या गाण्यात अमृता यांनी गायनाबरोबर डान्सही केला आहे. अमृता यांनी आपल्या चाहत्यांना या गाण्यावर डान्स करण्याचे चॅलेंज दिले आहे.