सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 23 एप्रिल 2022 (17:55 IST)

भरमंडपात नवरा-नवरीमध्ये रंगली पुशअप स्पर्धा

pushup competition
सध्या सोशल मीडियावर लग्नाचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. नवरा नवरी स्टेजवर लग्नातील पोषाखासह चक्क पुशअपची स्पर्धा करताना दिसत आहे. आता दावा न केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. यावर नेटिझन्स कमेंट करत आहेत.
 
bridal_lehenga_designn नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.या व्हीडिओला अनेकांनी पाहिलंय. लाईक केलंय. “याला म्हारी छोरी छोरो से कम है के…”, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. तसेच यात वधू आपल्या वराला पुशअप्स करताना कडवी टक्कर देत असल्याचे दिसत आहे.  यावर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर काहींनी मात्र या व्हीडिओची खिल्ली उडवली आहे. हेच बघायचं राहिलं होतं!, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे.