सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By विकास सिंह|
Last Updated : शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (20:21 IST)

कोरोनाला घाबरु नका, आजार जितका गंभीर तितकेच बचाव उपाय सोपे: मनोचिकित्सक

देश एकदा पुन्हा कोरोना व्हायरसला सामोरा जात आहे. दररोज आकडे वाढत आहे. साखळी तोडण्यासाठी सरकार लॉकडाउन लावण्याबद्दल विचार करत आहे. कोरोना संसर्गा वाढण्यामागील प्रमुख कारण म्हणजे सामाजिक अंतर न पाळणे आणि मास्क न वापरणे मानले जात आहे. असं घडत असताना अजूनही लोक म्हणत आहे की कोरोना व्हायचाच असेल तर होईलच.
 
कोरोनाबद्दल लोकांची प्रतिक्रया अशी का याबद्दल ‘वेबदुनिया’ ने प्रसिद्ध मनोचिकित्सक डॉक्टर सत्यकांत त्रिवेदी यांच्यासोबत चर्चा केली. तेव्हा डॉक्टर सत्यकांत त्रिवेदी म्हणतात की साथीच्या आजारासोबत एक पॅनिक मोड आणि एंजायटी क्रिएट होते कारण कुणालाच त्या आजराबद्दल फारसं माहित नसतं. अशात काही लोक एंजायटी कमी करण्यासाठी आपल्या पातळीवर माहिती गोळा करायला सुरु करतात आणि काही लोक एंजायटीपासून वाचण्यासाठी आजराकडे दुर्लक्ष करतात.
 
सध्या ही दुहेरी मानसिकता हा रोग पसरविण्याचे सर्वात मोठे कारण असल्याचे दिसते. ही महामारी अत्यंत धोकादायक असली तरी याहून बचावाचे उपाय सोपे आहेत जसे मास्क लावणे, सोशल डिस्टेंसिंग याचे आपल्या जीवनशैलीत पालन करणे. अशात लोकांच्या मनात हा प्रश्न देखील उद्धवतो की इतका गंभीर रोग इतक्या लहानश्या उपायाने कसं काय बचाव करता येईल. अर्थात इतक्या सोप्या साधनांनी साथीच्या आजारावर नियंत्रण कसं करता येईल. त्यांच्या मनात दुहेरी मानसिकता जन्माला येते की रोग गंभीर आहे तर उपाय देखील त्याच्या तोडीचे असले पाहिजे.
 
मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम - ‘वेबदुनिया’ सोबत चर्चा करताना डॉक्टर सत्यकांत त्रिवेदी सांगतात की कोरोना केस वाढण्याचा थेट परिणाम लोकांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. मागील 15 दिवसात अचानक रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे लोकांच्या मानत आशंका आणि पुन्हा लॉकडाउन लागणार का याबद्दल काळजी दिसू लागली आहे.
 
कोरोना आणि लॉकडाउनच्या बातम्यांमुळे लोकांची झोप उडाली आहे. लोकांमध्ये वेगळ्याच प्रकाराची एजांइटी बघायला मिळत आहे. ते सांगतात की कोरोना आणि लॉकडाउनच्या भीतिमुळे रुग्ण पुढील 6 ते 8 महिन्यापर्यंतचे औषध लिहून द्यावे अशी विनंती करत आहे. तसंच कोरोनाला मात करणार्‍या लोकांमध्ये देखील पोस्ट कोव्हिड एंजाइटी बघितली जात आहे. पुन्हा कोरोना होण्याची शक्यता तर नाही हे त्यांच्या मनात घर करत आहे.
 
कोरोनाची भीती दूर करा- डॉक्टर सत्यकांत लोकांना सल्ला देत आहे की सध्या कोरोनासंबंधित नकारात्मक उदाहरणांपासून जरा लांबच राहावे. कोणत्याही प्रकाराची भीती मनात नसावी. कोरोनाबद्दल माहिती हवी असल्यास वैज्ञानिक माहितीच घ्यावी. सोबतच बातम्या बघून केवळ काळजी करत बसू नये.
 
डॉक्टर सत्यकांत म्हणतात की कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवायचा असेल तर सुरुवात घरापासून करावी. व्हायरसपासून बचावासाठी मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग अत्यंत आवश्यक आहे हे विसरता कामा नये.