शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मार्च 2023 (11:55 IST)

चिमणीला तहान लागली, सायकलस्वारने थांबून बाटलीतून पाणी पाजले

cyclist stopped and share water with thirsty sparrow video viral
उन्हाळ्याचे दिवस जवळ येत आहेत आणि जसजसे तापमान वाढत आहे, तसतसे आपण स्वतःची काळजी घेण्यास सुरु केली आहे. पण या तडफडत्या उन्हात आपल्या सभोवतालचे छोटे प्राणी आणि पक्षी यांना विसरू नये म्हणून यांची तहान शमवण्यासाठी पाण्याचे छोटे भांडे आपल्या गच्चीवर, अंगणात किंवा जिथे कुठे शक्य असेल ठेवावे. कदाचित हाच संदेश भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा (IFS Sushant Nanda) यांना एका आकर्षक छोट्या व्हिडिओद्वारे द्यायचा आहे.
 
सुशांत नंदा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक सायकलस्वार तहानलेल्या चिमणीला पाणी देत ​​आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ती व्यक्ती आपल्या बाटलीतील पाणी झाकणात ओतते आणि चिमणीसमोर ठेवते जेणेकरून तिला पाणी पिता येईल.